`तारे ज़मीन पर` फेम बालकलाकार इतका मोठा झाला? आमिरचं नाव घेताच म्हणतो, `अशक्यच..`
Entertainment News : परफेक्शनिस्ट, अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्यासोबत झळकलेले अनेक कलाकारज आज प्रसिद्धीझोतात आहेत.
Entertainment News : वेगळ्या विषयांना हाताळत ते विषय अतिशय संवेदनशीलपणे रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या अभिनेता आमिर खाननं काही वर्षांपूर्वी 'तारे ज़मीन पर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटातून दर्शील सफारी हा बालकलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला पाहताना अनेकांनाच स्वत:चं बालपण आठवलं. दर्शीलनं ही भूमिका साकारली आणि पाहता पाहता तो प्रसिद्धीझोतातही आला. पण, त्यानंतर तो आमिर खानसोबत मात्र कधीच झळकला नाही.
दर्शीलनं आमिरसोबत काम का केलं नाही? अपेक्षित यश त्याला मिळालंच नाही का? असेच प्रश्न मग अनेकांच्या मनात घर करु लागले. अखेर खुद्द दर्शीलनंच एका मुलाखतीत या प्रश्नांची उत्तरं दिली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आमिरसोबतच्या समीकरणावरून त्यानं पडदा उचलला. (taare Zameen par Darsheel Safary on constantly calling Aamir Khan entertainment news)
काय म्हणाला दर्शील?
आमिरनं तुझ्या करिअरला पुरेसा हातभार नाही लावला असं तुला वाटतं का? अशा आशयाचा प्रश्न विचारला असता दर्शील म्हणाला, 'नाही, असं कधीच नाही झालं. मी प्रचंड लाजाळू आहे. किंबहुना मला या सर्वच गोष्टींबाबत संकोचलेपणा वाटतो. मी तुम्हाला सांगूही शकत नाही की, आमिर काकांसोबत तुझं बोलणं होतं का? त्याला एखादा मेसेज कर, फोन कर, असंच कर तसंच कर असं मला कित्येकांनी कित्येकदा सांगितलं आहे'.
इतरांनी आमिरला फोन करण्याविषयी दिलेले सल्ले ऐकता, हे अशक्य असून आपल्याला हे सर्वकाही जमतच नाही किंबहुना आता ते सांगावं तरी कसं हेसुद्धा मला जमत नाही. कारण काही गोष्टी या नैसर्गितरित्याच झाल्या पाहिजेत असाच सूर दर्शीलनं आळवला.
हेसुद्धा वाचा : NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?
Taare.... नंतर दर्शीलनं आमिरसोबत काम केलं नाही. पण, तरीही तो ज्या प्रोजेक्ट्समध्ये सहभागी होता त्याची माहिती या न त्या माध्यमातून आमिरपर्यंत पोहोचतच होती. आपण आमिरसोबत भविष्यात स्क्रीन शेअर करु इच्छितो पण, त्यासाठी Hi sir, I am here... वगैरे आपल्याला जमणार नाही. हो, पण मी आज जो काही आहे ते आमिर खान यांच्यापुढं मांडायला मला नक्कीच आवडेल कारण त्यांच्याकडून मी खूप काही शिकलोय असंही असंही दर्शीलनं सांगितलं.