मुंबई : अभिनेत्री तब्बू  एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली भाषेतील चित्रपट तसेच एका हॉलिवूड चित्रपटात सिनेमात काम केलं असलं, तरी तिने मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला  आहे आणि चार वेळा सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीच्या श्रेणीत सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. मात्र अभिनेत्री यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
 
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने बॉलिवूडला (Bollywood) आत्तापर्यंत एका पेक्षा एक सिनेमा दिले आहेत. आत्ता पर्यंत अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. नुकतीच तब्बूची एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ज्यामधील अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सने सगळीकडेच खळबळ माजली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीने आपल्यापेक्षा वयाने लहान ईशान खट्टरसोबत बोल्ड सीन दिले होते. जे पाहून दोघांच्याही चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम सेठ यांच्या नोबेलवर आधारित ही वेब सिरीजमध्ये बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार केल्या गेल्या होत्या. ही वेबसिरीज खूप दमदार होती. याचबरोबर या सिरीजमध्ये खूपच जास्त बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. या सिरिजमध्ये तब्बू वेश्या व्यवसायिकेच्या भूमिकेत आहे. तब्बूची अनेकांना आवडली तर अनेकांनी मात्र या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 


या  या वेब सीरिजमध्ये तब्बूने स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणले आहेत. तिने तिच्या डोक्यापासून पायापर्यंत सगळ्याच बाबतीत तिने स्वत:ला बदलंल आहे. प्रेक्षकांमध्ये या वेब सिरीजबाबत कमालीची क्रेझ पहायला मिळते. जर तुम्ही ही वेब सिरीज अजून पाहिली नसेल तर तुम्ही देखील ही सिरीज फॅमिलीसमोर पाहण्याचं धाडसं करु नका. कमी वयाच्या अभिनेत्यासोबत बोल्ड सीन्स दिल्यामुळे तब्बूला ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. 


 या वेब सिरीजची कथा म्हणजे, 25 दशकातील उत्तर प्रदेशची एक छोटीशी झलक आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना तिथून कोलकात्याच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली आहे. ही रंजक कथा लिहिणाऱ्या लेखकाला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल.


 बॉलीवूड कलाकार त्यांच्या पात्रात जीव ओतून काम करत असतात. काहींनी तिच्या या पात्राचं कौतुकही केले होते. अनेकांनी मात्र तिला ट्रोलही केलं होतं.