मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता अजय देवगण यांना ९० च्या दशकात अनेक सिनेमात रोमांस करताना पाहिले गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ते 'दृश्यम' आणि 'गोलमाल अगेन' मध्ये एकत्र दिसले. या दोन्ही सिनेमांमध्ये कोणता रोमॅंटीक अॅंगल दिसला नाही. 


आनंदाची बातमी  



 पण अजय आणि तब्बूच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी येत आहे. हे दोघेही रोमांस करताना दिसणार आहेत.


रोमान्स सीन नाही


 नुकतीच अजय आणि तब्बू ही जोडी गोलमाल अगेनमध्ये दिसली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पण यात त्यांचा कोणता रोमान्स सिन दिसला नाही.


आगामी सिनेमा 


मीडिया रिपोर्टनुसार अजय आणि तब्बू लव रंजनच्या सिनेमात रोमांस करताना दिसणार आहेत.सिनेमाचे शुटींग पुढच्या वर्षी मे महिन्यानंतर सुरु होणार आहे. आयुष्यातील नात्यांबद्दल हा सिनेमा भाष्य करणार आहे.


चांगले मित्र 


हे दोघे चांगले को स्टार्सच नव्हे तर त्यांच्यात चांगली मैत्री देखील आहे.  या दोघांनी विजयपथ, तक्षक, दृश्यमआणि गोलमाल अगेन या सिनेमात एकत्र काम केले आहे.