मुंबई : फक्त सोशल मीडियावर नाही तर घराघरात सुद्धा चर्चा सुरु आहे ती बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत असल्याची. तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपट हे सुपरहिट ठरत आहेत. नुकतंच बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि खिलाडी कुमार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटांना पाहिजे तितके यश मिळाले नाही. एवढंच काय तर प्रेक्षकांनी हे चित्रपट पाहण्यास इच्छूक नसल्याचे दाखवले आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना खूप नुकसान झालं आहे. यावरच आता अभिनेत्री तब्बूनं (Tabu) यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी वाचा : प्राजक्ता माळीचं चॅलेंज, सई ताम्हणकरची बोबडी वळली; पाहा Viral Video
 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तब्बूनं या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. ‘मी याचा जास्त विचार करत नाही. मला वाटतं की कलाकारांनी ताण घेण्याची गरज नाही. या गोष्टींमध्ये आम्ही नशीबवान आहोत. कारण आमचे पैसे चित्रपटात गुंतवले गेले नाहीत. फक्त आपलं काम चांगलं असलं पाहिजे आणि चित्रपटही चांगला असायला हवा. निर्मात्यांना बॉक्स-ऑफिसवरील आकड्यांबद्दल काळजी असते, पण हो तुमचा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा नक्कीच बरे वाटते', असे तब्बू म्हणाली.


आणखी वाचा : ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल


पुढे तब्बू कलाकाराच्या ब्रँड व्हॅल्यू आणि बॉक्स ऑफिसच्या कमाईचा त्याच्या करिअरवर होणारा परिणाम सांगत म्हणाली, ‘जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होतो. मात्र जर चित्रपटाला अपयश आलं तर याचा त्रास नक्कीच होतो. 


आणखी वाचा : किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video


तब्बू पुढे म्हणाली की,'एखादा चित्रपट यशस्वी असो की अयशस्वी, एखाद्या अभिनेत्याच्या करिअरचे भवितव्य लगेच ठरत नाही, त्यासाठी वेळ लागतो. एखादा चित्रपट फ्लॉप झाला की अभिनेत्याचं करिअर लवकर संपतं, असं मला वाटत नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे काम मिळणे बंद होते, असेही नाही.'


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


दरम्यान, तब्बू सगळ्यात शेवटी ‘भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तब्बूच्या दोन भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लवकरच तब्बूचा 'दृश्यम २' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.