बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आपला आगामी चित्रपट 'औरो मे कहाँ दम था' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासह अजय देवगण (Ajay Devgan) आणि जिमी शेरगिल (Jimmy Shergil) प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अजय देवगण आणि तब्बूचा हा एकत्रित 10 वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बू सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच निमित्ताने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत तिने विरासत चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. तब्बू ग्रामीण भागातील मुलगी दिसावी यासाठी प्रियदर्शन यांनी तेलाची बाटली डोक्यावर ओतली होती असा खुलासा तिने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बूने सांगितलं की, "प्रियदर्शन यांना मी एकदम ग्रामीण भूमिकेत दिसायला हवी होती. माझे केस त्यांना तेलकट हवे होते. त्यामुळे हेअरस्टायलिस्टने मला सांगितलं की, थोडं जेल घेऊन डोक्याला लाव त्यामुळे ते तेलकट दिसतील. मी जेव्हा सेटवर पोहोचले तेव्हा ते म्हणाले की, 'मी तुला केसांना तेल लावायला सांगितलं होतं'. मी म्हणाली, 'हो थोडंसं. ते आता चमकत आहेत'. यानंतर ते गेले आणि थोड्या वेळाने नारळ तेलाच्या बाटलीसह आले. ते माझ्या मागे उभे राहिले आणि सगळी बाटली माझ्या डोक्यावर ओतली".


"केसांना तेल म्हणजे मला हे अपेक्षित आहे असं ते म्हणाले. पण त्यानंतर माझ्यासाठी अनेक गोष्टी सहज झाल्या. मला कोणतीही हेअरस्टाईल करण्याची गरज नव्हती. मी पाच मिनिटांमध्ये तयार व्हायचे. मोठ्या केसांना तेल लावून सेवटर पोहोचायचे," असं तब्बूने पुढे सांगितलं. 


विरासत हा तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात अनिल कपूर, तब्बू आणि पूजा भत्रा यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. तब्बूने चित्रपटात ग्रामीण भागातील साध्या मुलीची भूमिका निभावली होती. 


तब्बू सध्या 'औरों में कहाँ दम था'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो प्रदर्शित होईल. ट्रेलर शेअर करताना तब्बूने " तीव्र. अविस्मरणीय! AuronMeinKahanDumTha Trailer Out Now!" असं शेअर केलं आहे. 


अजय देवगण आणि तब्बू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, विजयपथ, हकीकत, भोला आणि दृश्यम अशा अनेक चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसले होते. नीरज पांडे दिग्दर्शित 'औरों में कहां दम था' या चित्रपटात जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी देखील आहेत.