taimur ali khan च्या हातावर मुलीच्या नावाचा टॅटू
सोशल मीडियावर आपल्याला इनाया आणि तैमूर अली खानचे फोटो बऱ्याचदा पाहायला मिळतात.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला इनाया आणि तैमूर अली खानचे फोटो बऱ्याचदा पाहायला मिळतात. चाहते तैमूरच्या एका झलकची वाट पाहत आहेत. त्याच वेळी, इनायाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, करीना कपूरसह तैमूर अली खान, इब्राहिम अली खान आणि छोटा जेह अली खान देखील पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते.
त्याचबरोबर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कधी तैमूर पार्टी एन्जॉय करताना दिसतो तर कधी तो इनायाला मिठी मारताना दिसतो.
करीनाने शेअर केले फोटो
करीना कपूरने अलीकडेच एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यात क्यूट तैमूर इनायाला जादूची मिठी देताना दिसत आहे. या दोघांचे हे सुपर क्युट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, एवढेच नाही तर, त्यांचा आणखी एक फोटो आहे.
जेथे तैमूर इब्राहिमसोबत दिसत आहे आणि दोघांनी आपल्या हातावर समान टॅटू काढला आहे. कुणाल खेमूने आपल्या राजकुमारीसाठी युनिकॉर्न थीम असलेली पार्टी आयोजित केली होती.
या पाहुण्यांची पार्टीला हजेरी
करीना व्यतिरिक्त नेहा धुपिया, सबा अली खान आणि इतर विशेष पाहुणे इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसले.
बर्थडे गर्लचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इनाया सैफ अली खानची बहीण सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी आहे आणि यावर्षी तिला 7 वर्ष पुर्ण झाली आहे.