मुंबई : सैफ आणि करिनाचा मोठा मुलगा तैमूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा जरा वेगळ्या कारणामुळे आहे. आता जरी तो छोटा नसला तरी गोंडस तैमूर आता मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे त्याची वृत्तीही मोठ्या भावांसारखी असते. आता त्याला नवाबी छंदही आजमावू लागले आहेत. तैमूर नुकताच वडील सैफसोबत दिसला. वडिलांचा हात धरून तो बंदूकबाजी करण्यासाठी आला होता. पण बंदुकीवर हात आजमावण्याआधीच वडिल सैफने त्याला हात जोडण्यास भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूरचा नमस्कार
पांढरा शर्ट आणि तपकिरी शॉर्ट्समध्ये तैमूर स्वतः एखाद्या स्पोर्ट्स पर्सनपेक्षा कमी दिसत नाही. तैमूर पांढऱ्या तर वडिल सैफ काळ्या शर्टमध्ये आहे. दोघांच्या स्पोर्टी लूकवरून स्पष्ट दिसतंय की, वडील आणि मुलगा काही आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी बाहेर गेले आहेत. अचानक सैफ खाली वाकतो आणि तैमूरला काहीतरी म्हणतो आणि तैमूर हात जोडलेला दिसतो. हे फोटो पापाराझी विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या पोस्टला विरल भयानी यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'बेटा, नमस्ते कर.'


फोटो पाहून असं वाटतंय की, कॅमेरा पर्सनकडे पाहून सैफ तैमूरला शुभेच्छा देण्याचा सल्ला देतो आणि ते लगेच नमस्तेची पोज देऊन उभे राहतात. या पोस्टसोबत कोलाज बनवून आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये सैफ आणि तैमूरसोबत उपस्थित असलेला व्यक्ती बंदूकबाजी करताना दिसत आहे.



चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला
तैमूरच्या या फोटोवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तैमूरच्या या लूकचं कौतुक केलं जात आहे. याचबरोबर चाहते तैमूरला शिकार न करण्याचा सल्ला देत आहेत.