तैमूरचा `हा` हटके लूक होतोय व्हायरल
तैमूर अली खान हा मीडियातील सर्वात चर्चेत असलेला आणि लोकप्रिय स्टार किड्स आहे.
मुंबई : तैमूर अली खान हा मीडियातील सर्वात चर्चेत असलेला आणि लोकप्रिय स्टार किड्स आहे.
सोमवारी पुन्हा एकदा तैमूर आपली कझिन इनाया खेमूसोबत मीडियासमोर आला. सोमवारी तैमूर करीना आणि सैफ अली खानसोबत सोहा आणि कुणाल खेमूच्या घरी दिसले. पटौदी आणि खेमू परिवार कुटुंबासोबत दिसले.
तैमूर अली खानचा हटके लूक
तैमूर अली खान यावेळी आपल्याला शर्टलेस लूकमध्ये दिसला. तैमूर यावेळी आपल्या वडिलांच्या म्हणजे सैफजवळ होता तर इनाया सोहा अली खानसोबत दिसला. या फॅमेली गेट टू गेदरमध्ये करीनाची अगदी जवळची मैत्रिण अमृता अरोरा देखील होती.
सोमवारी करीना आपल्या संपूर्ण कुटुंबाला भेटली. या मिटिंगबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. करीना कपूर फॅन क्लब पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
पार्टीला या व्यक्ती होत्या उपस्थित
सोमवारी करीना आणि सैफने शशी कपूरच्या 80 व्या जन्मदिनानिमित्त एका डिनरच आयोजन केलं होतं. यावेळी रणधीर कपूर, रिमा जैन आणि त्यांची मुले अरमान, आदर, शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर देखील उपस्थित होता.