मुंबई : तैमुर अली खान हा सोशल मीडियावरील प्रसि्द्ध स्टार कीड. तैमुर म्हणजे खूप गोडवा. हा छोटा नवाब सध्या आपल्या आई-वडीलांसोबत म्हणजे करिना आणि सैफ सोबत स्विझर्लंड्ला गेला आहे. थंडीची सुट्टी बर्फात एन्जॉय करायला. 


सुट्टीचा आनंद कमेऱ्यात टिपला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्टीचा आनंद घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या फोटोत थंडीच्या जॉकेटमध्ये तैमुर अत्यंत क्यूट दिसत आहे. करिना आणि सैफ देखील थंडीला सामोरे जाण्यासाठी फुल्ल तयारीत दिसत आहेत.



 


पतोडी पॅलेसनंतर स्विझर्लंड्ला...


२० डिसेंबरला तैमुर वर्षाचा झाला. त्याचा पहिला वाढदिवस पतोडी पॅलेसमध्ये साजरा करण्यात आला. तेथून परतल्यानंतर तैमुर आपल्या आई-बाबांसह स्विझर्लंड्ला रवाना झाला.