मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा लाडका मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. अलीकडेच छोट्या तैमूरचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मोठ्या भावासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोंडात बोट, चेहऱ्यावर गोंडस हास्य, तैमूरचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो करीना कपूर खानने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.हा फोटो शेअर करत करीना कपूर खानने कॅप्शनमध्ये लिहिले - आम्ही नेहमी बेडवर बसून पिझ्झा खातो.


भावासोबत पिझ्झा खाण्यात एक वेगळीच मजा आहे, कियान, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हॅपी बर्थडे डार्लिंग...



हे फोटो करीना कपूर खानने तिची बहीण करिश्मा कपूरच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोस्ट केले होते. या फोटोमध्ये तैमूरची मोठ्या भावासोबत जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे.


तैमूर भावासोबत या फोटोत पिझ्झा पार्टी करताना दिसत आहे. त्याने या पार्टीसाठी फक्त भावालाच बोलावलं आहे. दोघांचा हा फोटो सध्या खूपच चर्चेत आहे.