नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमुर नेहमी चर्चेचा विषय ठरतो. त्याचा क्युटनेस, त्याची मस्ती अनेकांना त्याच्या प्रेमात पाडते.


तैमुरची पहिली पार्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर २५ डिसेंबरला कपूर परिवाराने आयोजित केलेल्या पार्टीत तैमुर देखील आला होता. ही त्याची पहिलीच पार्टी असेल. मात्र पार्टीत सर्वांच्या नजरा तैमुरवर खिळल्या होत्या. काही सर्वांचे लक्ष आपल्याकडे आहे हे कळताच तैमुरनेही आपल्या बालक्रिडा दाखवायला सुरूवात केली.


बालक्रिडा व्हिडिओत कैद 


त्याच्या या बालक्रिडा व्हिडिओत कैद झाल्या आहेत. या व्हिडिओत आई करिनाचे सनग्लासेज घालून तैमूर आपला कूल लूक दाखवत आहे. इतकंच नाही तर त्याची मस्ती पाहून उपस्थित मंडळी अगदी खूश झाली. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २० डिसेंबरला तैमुरचा पहिला बर्थडे साजरा करण्यात आला. यावेळी फक्त कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले होते.