मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान सध्या चर्चेत आहे. तिने आपल फोटोशूट केलय. हे कोणत बोल्ड किंवा हॉट फोटोशूट नाहीए. तर तिचे पारंपारिक पेहरावातील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. आपली मम्मी अमृता सिंह आणि डिंपल कपाडिया सोबत तिने डिसेंट फोटोशूट केलयं. तिच्या चाहत्यांना हे फोटोशूट खूप आवडलय. वजनदार ड्रेससोबत साराने वेणी बांधून खांद्यावर सोडली आहे. बांगड्या आणि मोठमोठे झुमके तिचा लुक अजून अट्रॅक्टिव बनवत आहेत. सौंदर्यामध्ये सारा आपल्या आईला टक्कर देत असल्याचे या फोटोतून स्पष्ट दिसतय.प्रसिद्ध डिझायनर अबु जानी यांनी हे फोटो शेयर केले आहेत. 

 


 

'केदारनाथ'मधून डेब्यू 


अमृताने सफेद रंगाचा अनारकली पेहराव केलाय तर डिम्पलने सोनेरी बॉर्डरची साडी घातली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


तिघीही आपली वेशभूषा आणि शानदार लूकमुळे आकर्षक दिसत आहेत.



'केदारनाथ' सिनेमातून सारा आपल्या करियरची सुरूवात करत आहे. त्यानंतर 'सिंबा' हा तिचा आगामी सिनेमा असणार आहे. त्यामध्ये ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.