मुंबई  : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी हा सध्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुव्रत जोशी हा नेहमीच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. शुभांगी गोखले यांचा तो जावई आहे. शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखलेसोबत त्याने काही वर्षांपुर्वी लग्नगाठ बांधली. हे कपल मराठी सिनेसृष्टीतील सर्वात चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक आहे. नेहमी सखी आणि सुव्रत त्यांच्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच ते त्यांच्या सोशल मीडिावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही शेअर करत असतात. नुकतेच हे कपल थांयलंडला वेकेशनसाठी गेलं आहे. याच वेकेशनचे फोटो व्हिडीओ हे सेलिब्रिटी कपल शेअर करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सुव्रतने एक स्ट्रीट फूडचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो किडे खाताना दिसत आहे. व्हिडीओ सुरु असताना, सुरुवातीला प्रोटीन भरपूर खाल्याने किडकिडीत मी कधीच नव्हतो. असं कॅप्शन व्हिडीओच्या मध्ये दिसतंय. तर पुढे अंगातले किडे काय कमी होते का? म्हणून आज खरे किडे खाऊन बघावे म्हटलं. मोमेंट ऑफ ट्रूथ. असं म्हटलंय.  पुढे नाकतोडा ५, रातकिडा ६.५, असं लिहीलंय तर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, हा जेवणाचा व्हिडिओ जेवताना बघू नये किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा कधीतरी त्यांना खाऊन बघावे म्हटलं! खाताना आधी हातापायाला मुंग्या आल्या आणि नंतर डोक्यात भुंगा! किडे खाऊन मी माती खाल्ली का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


असं सुव्रतने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय. अनेकांनी त्याच्या व्हिडीओवर कमेंट करत त्याला ट्रोल केलंय. तर अनेकांना त्याची ही स्टाईल आवडली आहे. तर अभिनेता आशय कुलकर्णीने कमेंट करत लिहीलंय की, मी असं ऐकलय तिथे पालीची कोशिंबीर अप्रतिम मिळते. तर अजून एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, खरं सांग रिल शूट करून घशात बोटं घालून उलट्या केल्यास ना तर अजून एकाने म्हटलंय, ईतके श्रीमंत व्हा की परदेशात जाऊन किडे मुंग्या खाता आलं पाहिजे. तर अजून एकाने म्हटलंय, आयीईई  आवडलाय मला हे…. चला आता अधिकृतपणे लोकं बोलायला मोकळी… सुव्रतच्या अंगात किडे आहेत. अशा प्रकारच्या अनेक कमेंट लोकं सुव्रतच्या या व्हिडीओवर करत आहेत. 


मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक सुव्रत जोशी आहे. त्यानं मराठीबरोबर हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं एक वेगळीच छाप उमटवली आहे. सध्या तो ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.