Tamannaah Bhatia Vijay Varma Love Story: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) अभिनेता विजय वर्मासोबत (Vijay Varma) आपण रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. तमन्नाने 'लस्ट स्टोरी 2'च्या (Lust Stories 2) सेटवर आपलं प्रेम प्रकरण सुरु झाल्याची कबुली दिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तमन्ना आणि विजय वर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन 4 दिग्दर्शकांनी केलं आहे. यात अमित शर्मा, कोकाणा सेनशर्मा, आर बाल्की आणि सुजोय घोष यांचा समावेश आहे. 


अनेक महिन्यांपासून चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून रंगली होती. गोव्यामधील नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये या दोघांनी एकमेकांना किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासूनच या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु होती. मात्र दोघांनी कधीच या बद्दल उघडपणे भाष्य केलं नाही. दरम्यानच्या काळात ते अनेकदा मुंबई एकत्र फिरताना दिसून आले. "आम्ही एकत्र चित्रपटामध्ये काम केलं आहे. अशा अफवा पसरत राहतात. या सर्वांवर स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही. याबद्दल मी अधिक काही बोलू शकत नाही," असं तमन्नाने यापूर्वी तिच्या आणि विजय वर्माच्या अफेअरबद्दल बोलताना म्हटलं होतं. 


तमन्नाने दिली कबुली


मात्र आता तमन्नाने थेट आपण विजय वर्माला टेड करत असल्याची कबुली दिली आहे. 'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तमन्नाने, "तुम्ही फक्त एकत्र काम करता म्हणून तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होता, हे मला पटत नाही. मी अनेक लोकांबरोबर काम केलं आहे. मला वाटतं की एखादी व्यक्ती जेव्हा आवडते, तिच्यासाठी आपल्या मनात विशेष भावना निर्माण होत असतील तर ही फार खासगी बाब आहे. मग यावेळी ती व्यक्ती जगण्यासाठी (अर्थाजर्नासाठी) काय काम करते हे फार महत्त्वाचं नसतं. म्हणजे केवळ एकत्र काम करतो म्हणून प्रेमात पडलो असं होतं नाही इतकं मला म्हणायचं आहे," असं सांगितलं.


जोडीदाराबद्दल भरभरुन बोलली


डेट करायला सुरुवात केल्यानंतर विजयबरोबर 'लस्ट स्टोरी 2'च्या सेटवर काम करताना काही फरक पडला का? याबद्दल तमन्नाला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना तमन्नाने, "होय" असं उत्तर दिलं. त्यानंतर तमन्नाने विजयबद्दल भाष्य केलं. "तो खरोखरच अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडे मी फार आशाने पाहतो. तो अशी व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर मी फार माझी राहून बॉण्डींग करु शकते. तो माझ्याकडे येताना त्याच्याकडील सर्व गोष्टी विसरुन येतो, असा आहे. तोच माझ्यासाठी सर्वकाही सोडून येत असल्याने मलाही तसं करणं फार सोपं जातं. फार काही मिळवलेल्या महिलांबरोबरच हीच अडचण असते की तिला सर्व गोष्टी मिळवण्यासाठी फार झगडावं लागतं असं आपल्याला वाटतं. मात्र गोष्टी सहज शक्य असतानाच उगाच कठीण मार्गावर का चालायचं? आपल्याकडे भारतामध्ये असा समज आहे की महिलांना एखाद्या व्यक्तीसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलावं लागतं. तुम्ही जोडीदार शोधत असाल तर तुम्हा दुसरीकडे स्थलांतरीत व्हावं लागतं कारण आणि बऱ्याचं गोष्टी कराव्या लागतात," असं तमन्ना म्हणाली.


तो सोबत असताना...


तसेच पुढे बोलताना तमन्नाने आपल्याला विजयसाठी कोणत्याही गोष्टी सोडाव्या लागल्या नाहीत तर त्यानेच मला समजून घेतलं, असं सांगितलं. "माझ्याबाबतीत असं (इतर भारतीय स्त्रीयांप्रमाणे) झालं नाही कारण मी माझं एक विश्व निर्माण केलं आहे आणि मला अशी व्यक्ती मिळाली आहे की ती मी बनवलेल्या या विश्वाला समजून घेते. बरं यासाठी मला काहीही विशेष प्रयत्न करावं लागत नाही. मला त्याच्याबद्दल फार मनापासून काळजी वाटते. हो तो माझी हॅपी प्लेस आहे. (तो सोबत असताना मी आनंदात असते)", असं तमन्ना म्हणाली.