Tamannaah Bhatia and Vijay Varma : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. त्या दोघांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तमन्ना आणि विजय हे दोघंही नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसले. मात्र, त्यांना रिलेशनशिपच्या चर्चांवर दुजोरा दिला नव्हता. अशात आता त्या दोघांचा 'लस्ट स्टोरीज 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेळी ते दोघेही त्यांच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणानं बोलताना दिसले. इतकंच नाही तर यावेळी ते पहिली डेट आणि इंटीमसी या दोघी गोष्टींवर बोलताना दिसले. आता तुम्हाला प्रश्नपडला असेल की ते त्या दोघांच्या डेटविषयी बोलत आहेत का? तर असं नसून ते दोघेही वेगवेगळ्या व्यक्तीसोबत डेटवर गेले असता त्याविषयी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमन्नाला एका मुलाखतीत त्यांच्या डेटिंग लाइफ विषयी प्रश्न विचारण्यात आला की ते कधी कोणत्या खराब डेटवर गेले आहेत का? त्यावर तमन्ना म्हणाली की हो तिच्यासोबत असं झालं आहे. तर पुढे तमन्ना आणि विजयला प्रश्न विचारण्यात आला की कधी ते दोघं पहिल्या डेटवर इंटिमेट झाले आहेत का? त्यावर उत्तर देत तमन्ना लगेच "नाही" असं म्हणाली. तर विजय थोडा विचार केल्यानंतर म्हणाला, "माझ्यासोबत असं झालं आहे असं मला वाटतंय, म्हणजे अशी शक्यता आहे." तर पुढे त्या मुलाखतीत उपस्थित असलेले चित्रपटाचे निर्माते सुजॉय घोष म्हणाले की "ते इतके भाग्यवान नाहीत." दरम्यान, त्यांनी ही मुलाखत न्यूज 18 ला ला दिली होती.



याच मुलाखतीत पुढे विजय सुजॉय घोष यांना म्हणाला, दुसऱ्या डेटवर गेल्यानंतर सेक्स केलं का आहे का? असा प्रश्न विजयनं विचारताच सुजॉयम्हणाला, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे, मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. माझ्यासाठी काहीही सोपं नाही.” 


हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड


पुढे चित्रपटातल नीना गुप्ता यांचा ‘लग्नाआधी टेस्ट ड्राईव्ह करायला हवी,’ या डायलॉगवर त्यांची सहमती आहे का असा प्रश्न विचारता तमन्ना आणि विजय म्हणाले की ते या डायलॉगशी सहमत आहेत. यावर उत्तर देत तमन्ना म्हणाली, नीना गुप्ता जे काही बोलतात त्याचे पालन करने खूप मोठे आव्हान आहे, कारण त्यांना सगळं माहित आहे. तर विजय म्हणाला की नीना गुप्ता जे काही बोलतात त्यावर त्याचा विश्वास आहे.  'लस्ट स्टोरीज 2' हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटात तमन्ना भाटिया, विजय वर्मा या दोघांच्या व्यतिरिक्त काजोल, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष, अंगद बेदी, मृणाल ठाकुर, नीना गुप्ता आणि तिलोत्तमा शोम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.