मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या मालदीवमध्ये वेकेशन मोडमध्ये दिसतेय. अभिनेत्रीने मालदीवमधील अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  शेअर केलेल्या फोटोंमध्ये तमन्ना मालदीवमध्ये आईस्क्रीम विकताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. शेअर केलेल्या फोटोत तमन्ना मालदीवमध्ये सायकलवर बसून आईस्क्रीम विकताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तमन्नाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, विचार करा सगळी आइसक्रीम कोणच्या ट्रंकमध्ये आहेत.


तमन्ना भाटियाच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर, या फोटोमध्ये तमन्नाने प्रिंटेड टीशर्ट सोबत ब्लू डेनिम शॉर्ट घातली आहे. तसंच कानात छोटे झुमके आणि नेक पीस घातल्यांच आपण अभिनेत्रीला या लूकमध्ये पाहू शकतो. याचबरोबर अभिनेत्रीने या लूकमध्ये ओपन हेअर ठेवले आहेत. 



या संपूर्ण लूकवर चाहते घायाळ होत आहेत. तसंच, या फोटोंमधील मागचं दृश्य डोळ्यांना आराम देणारं दिसत आहे. तमन्नाच्या या फोटोला चाहते फक्त लाईक आणि कमेंटच करत नाहीत तर तिचा फोटोही शेअर करत आहेत.