मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय याच्या आगामी ‘मरसल’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर काही तासातच १ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने साऊथमधील अनेक सिनेमांचे टीझरच्या व्ह्यू चे रेकॉर्ड तोडले आहेत. ट्विटरवर हे रेकॉर्ड ट्रेन्डही होत आहेत. 


विजय हा साऊथमधील मोठा स्टार असून त्याची अफाट लोकप्रियता आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याचा हा आगामी सिनेमाही उचलून धरला आहे. आताच या सिनेमाच्या टीझरला इतकी लोकप्रियता मिळाली असल्याने सिनेमा रिलीज झाल्यावर काय होईल, याचा अंदाज येतोय. विजय या सिनेमात एका जादुगाराची भूमिका साकारतो आहे. 



या सिनेमाचं दिग्दर्शन अटली यांनी केलं असून संगीत ए.आर.रहमान यांनी दिलंय. तर यात सुपरस्टार विजयसोबत तीन तीन अभिनेत्री दिसणार आहेत. यात समंथा, काजल अग्रवाल, नित्या मेनन या अभिनेत्री असणार आहेत. तर कटप्पा म्हणून लोकप्रिय झालेले सत्यराज यांचीही यात भूमिका आहे.