मुंबई : बहुचर्चित असलेला 'तांडव' नुकताच रिलीज झाला आहे. दिग्गज कलाकारांनी सज्ज झालेली ही वेब सीरिज रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया (Tigmashu Dhulia) आणि सुनील ग्रोवर (Sunil Grover) सारखे कलाकार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या वेबसिरीजवर आता सोशल मीडियावर चर्चा होतेय. अली अब्बास जफरने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरिजचं दिग्दर्शन काहींना आवडत आहे तर काहींनी यावर आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये हिंदूंच्या भावनांचा मुद्दा आला आहे. 



हिंदूंच्या देवाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सिरीजमधील एका सीनमुळे घडला आहे. एका सीनमध्ये बॉलिवूड अभिनेता मोहम्मद जीशान अयूब (Mohammed Zeeshan Ayyub)रंगमंचावर भगवान शंकराचं कॅरेक्टर प्ले करत आहेत. अशावेळी आणखी एक व्यक्ती स्टेजवर येते. त्यानंतरचं सगळं किट हे JNU शी जोडलं गेलं आहे. याचदरम्यान शंकराचं कॅरेक्टर प्ले करत असलेला अभिनेता जीशान अयूबने शिवी दिली आहे. 


या व्हिडिओवरून चाहत्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. हिंदू संघटना देखील या व्हिडिओमुळे नाराज आहे. सोशल मीडियावर 'तांडव' सीरिज ट्रोल होत आहे. तसेच सिनेमाच्या निर्मात्यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. ही वादग्रस्त क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.