`तान्हाजी...` आधीच अजयने केली किमया; काय ते एकदा वाचाच
`तान्हाजी: द अनसंग वॉरियर` २०२० मधला १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट...
मुंबई : अभिनेता अजय देवगनने त्याच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटासह बॉलिवूडमध्ये त्याची सेन्चुरी पूर्ण केली. चाहते, प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळण्याव्यतिरिक्त, अजयचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' २०२० मधला १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण, सैफ अली खान, काजोल स्टारर 'तान्हाजी...'ने आतापर्यंत जवळपास ११८.९१ कोटींची धमाकेदार कमाई केली आहे.
'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा २०२०मध्ये बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या घरात एन्ट्री करणारा पहिला चित्रपट ठरला असला, तरी आतापर्यंतच्या अजयच्या कारकिर्दीतील १०० कोटी कमाई करणारा हा अजयचा पहिलाच चित्रपट नाही. अजयच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा हा ११वा चित्रपट ठरला आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केलीये.
अजयच्या 'तान्हाजी...'आधी, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल ३' अजयचा पहिला १०० कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर 'टोटल धम्माल', 'गोलमाल अगेन', 'सिंघम रिटर्न्स' 'सन ऑफ सरदार', 'दे दे प्यार दे', 'रेड', 'बोल बच्चन', 'शिवाय', 'सिंघम' या चित्रपटांनीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली.
आमिर खान स्टारर 'गजिनी' चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करणारा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट ठरला.
सर्वाधिक १०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या कलाकारांमध्ये अजयचा तिसरा क्रमांक आहे. सलमान खानने आतापर्यंत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणारे १५ चित्रपट दिले आहेत. तर अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर सेन्चुरी करणारे १४ चित्रपट दिले आहेत. अजयने बॉलिवूडमध्ये १०० कोटी कमाई करणारे ११ दिले आहेत.
अजयचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे यांची वीरगाथा दाखवण्यात आली आहे. अजयच्या कारकिर्दीतील 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा त्याचा १००वा चित्रपट असून, काजोल-अजयही तब्बल १० वर्षांनंतंर रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळत आहेत.