मुंबई : काही दिवसांपूर्वी 'पद्मावती' या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांसमोर आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पावधीतच या चित्रपटाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ट्रेलरमधूनच या चित्रपटाच्या भव्यतेची जाणीव होते. 
रणवीर सिंग, शाहीद कपूर आणि दीपिका पादुकोण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राणी पद्मावती ची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारत आहे. 


'पद्मावती' या चित्रपटाला १३ व्या दशकाची पार्श्वभूमी आहे. तसेच चित्तोडच्या राजघरातील कहाणी असल्याने सार्‍याच कलाकारांचे कपडे, दागिने आणि लूक्सवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. 
राणी पद्मावतीचे दागिने साकारण्यासाठी सुमारे ४०० किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच २०० कारागिर सुमारे ६०० दिवस हे दागिने घडवण्यासाठी मेहनत करत होते. 
तनिष्क या प्रसिद्ध सोनं, चांदी आणि डायमंडचे दागिने घडवणार्‍या ब्रॅन्डने पद्मावतीचेही दागिने घडवले आहेत. या दागिन्यांच्या मेकिंगचा खास व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. 



 


पद्मावती हा सिनेमा १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग 'अल्लाउद्दीन खल्जी', शाहीद कपूर 'राजा रवल रतन सिंग आणि दीपिका पादुकोण 'पद्मावती'ची भूमिका साकारत आहे.