मुंबईः सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र अतरंगी असून प्रत्येक जण प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आता याच मालिकेतील एका अभिनेत्याचा बालपणीचा खट्याळ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



जेठालालच्या नाकात दम आणणारा हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय.



'जेठालाल' या पात्राभोवती ही मालिका फिरते. जेठालालच्या नाकात दम आणणारे अनेक पात्र या मालिकेत आहेत. त्यापैकी या एका कलाकाराचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.



हा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून 'गडा' इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणारा बागा आहे. 



बागा आणि नट्टू काका ही जोडी 'गडा' इलेक्ट्रॉनिक्समध्ये जेठालालचे कर्मचारी आहेत, मात्र त्यांच्या एक-एक युक्त्यांमुळे जेठालाल नेहमीच अडचणीत येतो.



बागाचं खरं नाव तन्मय वेकारिया असून गुजराती थिएटरमधून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आजतागायत तो या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.