`तारक मेहता...`ला आणखी एक झटका...ही अभिनेत्री सोडणार मालिका
अभिनेता शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता याने ही मालिका सोडली आणि आता बातमी येत आहे की आणखी एक सुंदरी आता या शोला अलविदा म्हणू शकते.
मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक निराशाजनक बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच या शोचा अभिनेता शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता याने ही मालिका सोडली आणि आता बातमी येत आहे की आणखी एक अभिनेत्री आता या शोला अलविदा म्हणू शकते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताही शो सोडण्याची शक्यता आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनसाठी मुनमुन दत्ताला अप्रोच केल्याची बातमी अलीकडेच समोर आली आहे. या रियालिटी शोचा एक भाग होण्यासाठी मुनमुन या शोला अलविदा म्हणू शकते.
या मालिकेमुळे मुनमुन दत्ता आज घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. लोक तिला मुनमुन दत्ता नावाने कमी पण बबिताजींच्या नावाने जास्त ओळखतात. तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता जीच्या प्रत्येक अदांवर जेठालाल फिदा आहे, तसंच मुनमुन दत्ताच्या अदांचे लाखो चाहते आहेत.
34 वर्षीय मुनमुन दत्ताचं अद्याप लग्न झालेले नाही आणि ती सध्या तिचे आयुष्य खूप एन्जॉय करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' याआधीही ती काही मालिकांमध्ये दिसली होती पण तिला या शोमधून लोकप्रियता मिळाली.
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे सुंदर व्हिडिओ शेअर करत असते.