मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो आजही खूप लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये काही वेळासाठीच दिसणारे कलाकार देखील लोकप्रिय होतात, वर्षानुवर्षे टीव्हीवर एका व्यक्तिरेखेत दिसणारी निधी भानुशालीचं देखील मोठं फॅन फॉलोविंग आहे.या मालिकेत निधीने आत्मराम भिडे यांच्या मुलींची भूमिका साकारली होती. 


 ती आता सोनूची भूमिका साकारत नसली,तरही तिला आजही लोकांचे प्रेम मिळत आहे. सोनू सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. आता सोनूने स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.


निधी भानुशालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती हातात सर्फिंग बोर्ड घेऊन दिसत आहे. तिने स्विमिंग ड्रेसमध्ये हे फोटो क्लीक केले आहेत.


या फोटोत तिच्यासोबत एका मुलगा देखील आहे. ज्याच्याबद्दल चाहते तिला कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहेत.



निधीचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. ती तिच्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.


आता निधीचा हा लेटेस्ट लूकही व्हायरल होत आहे. त्याची शैली लोकांना खूप आवडते. आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी निधीने तिच्या सर्फिंग कौशल्याची लोकांना जाणीव करून दिली आहे.