TMKOC: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दयाबेनच्या जागी कोणती अभिनेत्री येणार याची. 'तारक मेहता' ही मालिका गेली चौदा वर्षे सुरू आहे आणि सध्या दयाबेन मालिकेत पुन्हा येणार असल्याच्या चर्चांनाही मोठं उधाण आलं आहे. पाच वर्षांपुर्वी दयाबेन साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकानी गरोदर असल्यामुळे त्यांनी maternity leave घेतली होती. त्यानंतर मात्र त्या मालिकेतून परत दिसल्या नाहीत. जेव्हा त्यांनी ही मालिका सोडली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी इतकी वर्षे अजरामर केलेली दयाबेनची भुमिका अभिनेत्री दिशा वाकानी सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा चाहत्यांनी आपले दुःख व्यक्त केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून त्या मालिकेत परत येणार असल्याच्या बातम्या पुन्हा एकदा येऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही बरीच आशा लागून राहिली होती. त्या पुन्हा या मालिकेत कमबॅक करत असल्याच्या हुलकावणी कुठे खरी आहे असे वाटताच मात्र त्या दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि तेव्हापासून नव्या दयाबेनचा शोधही सुरू झाल्याचे समोर आले. 


आता याच चर्चांमध्ये अजून एका चर्चेची भर पडली आहे. दयाबेनची भुमिका साकारण्यासाठी आता अभिनेत्री काजल पिसाळ येणार असल्याची बातमी समोर येते आहे. याबद्दल असित मोदी यांनीच खुलासा केल्याचे समोर आले आहे. 


अभिनेत्री काजल पिसालबद्दल सांगायचे तर ती 'सीआयडी', 'बडे अच्छे लगते हैं', 'एक हजारों में मेरी बहना है', 'साथ निभाना साथिया', 'उडान', 'नागिन 5', 'ओन्ली तुम' यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी तिने ऑडिशन दिले होते आणि लवकरच तिची या शोमध्ये एंट्री होणार आहे असल्याचे समोर आले आहे. पण आता निर्माता असित मोदीने यांनी मात्र या अफवांवर आपले मतं जाहीर केले आहे.  त्यांच्या मते काजल पिसाळ ही नवीन दयाबेन होणार नाही.


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असितने मोदींनी सांगितले की, ''काजल पिसाळ ही नवीन दयाबेन म्हणून येत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मी काजलला ओळखतही नाही तसेच आमची कधी भेटही झाली नाही. अशा परिस्थितीत या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहिती नाहीये. सध्या या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन्स सुरू आहेत परंतु कोणीही फायनल झालेले नाही. ही प्रक्रिया झाल्यावर त्याची अधिकृत घोषणाही केली जाईल'', असे त्यांनी सांगितले आहे.