मुंबई : 'तारका मेहता' या लोकप्रिय मालिकेतील अब्दुल म्हणजेच शरद सांकला गेल्या २५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. पण अनेक शोज आणि ३५ हुन अधिक सिनेमांत काम केल्यानंतरही त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता त्याचे मुंबईत दोन रेस्टॉरन्ट आहेत. 


८ वर्ष काम नव्हते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९० मध्ये शरदने वंश या सिनेमात काम केले होते. त्यावेळी  चार्ली चॅप्लिनच्या छोट्याशा भूमिकेसाठी त्याला दिवसाला ५० रुपये मिळत होते. त्यानंतर त्याने खिलाडी, बाजीगर आणि बादशाह यांसारख्या अनेक सिनेमात काम केले. तरीही त्यानंतर ८ वर्ष त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. या ८ वर्षात त्याने वारंवार निर्मात्यांकडे फेऱ्या मारल्या. पण काम मिळत नव्हते. त्यानंतर मात्र १० वर्षांपूर्वी 'तारक मेहता' ही मालिका मिळाली आणि शरदने मागे वळून पाहिले नाही. 


आणि 'तारक मेहता'ला अब्दुल सापडला


मालिकेचे निर्माते असित मोदी आणि शरद कॉलेजमध्ये एकाच बॅचला होते. त्यांनी अब्दुलच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. सुरुवातीला २-३ दिवस शूटिंग असायचे पण अब्दुल ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्याने लोक काम वाढले आणि शरदला अब्दुल ही नवी ओळख मिळाली. अभिनय करण्याशिवाय मुंबईत शरदचे दोन रेस्टॉरन्ट आहेत. 'पार्ले पाईंट' जुहू तर 'चार्ली कबाब' अंधेरीत आहे. 


चौकोनी कुटुंब


शरद यांचा जन्म १९ जून १९६५ मध्ये मुंबईत झाला. शिक्षण सोडून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. २३ वर्षांपूर्वी प्रेमिलासोबत विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत.