Tarak Mehta Ka Oolta Chashma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही 'सोनी टेलिव्हिजन'वरील एक लोकप्रिय मालिका आहे. गेली चौदा वर्षे सलग ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकप्रिय आहेत. त्यात दिलीप जोशी यांचे पात्रही विशेष लोकप्रिय आहे. या मालिकेतील आत्माराम भिडे ही पात्र साकारणारे मंदार चंदावढकर यांची प्रवासही थक्क करणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली दुबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून मंदार चंदावढकर मुंबईला आले. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, ''मी बावीस वर्षांपुर्वी माझी दुबईतील इंजिनिरिंगची नोकरी सोडून मुंबईला आलो. खरंतर हा माझ्यासाठी खूपच मोठा डिसिजन होता कारण इंजिनिरिंगची नोकरी सोडून मी सरळ अभिनयक्षेत्रात येणार होतो. तेव्हा एका सेटल असलेल्या करिअरमधून दुसऱ्या करिअरमध्ये शिफ्ट होणं हे फारसे सोप्पे नसते. त्यामुळे माझ्यासाठी तो काळ फारच महत्त्वाचा होता.''


''2000 साली मी मुंबईत आलो आणि तेव्हा माझा अभिनयक्षेत्रातला संघर्ष सुरू झाला होता. मला सुरूवातीला फारशी कामं मिळत नव्हती पण नंतर जसजसं काम नंतर मिळाले तेव्हाच 'तारक मेहता' या मालिकेची ऑफर मला आली. आणि आता पुढं जे झालं तो तर इतिहासच ठरला. आज सर्वत्र माझ्या कामाचे कौतुक होते आहे, असे त्यांनी सांगितले. 



आत्मराम भिडे या पात्राची जादू...
मंदार हे 'तारक मेहता'च्या मालिकेत आत्माराम भिडे नामक पात्र साकारतात. आत्मराम भिडे हे कोकणातून आलेले शिक्षक आहेत अशी त्यांची या मालिकेतील व्यक्तिरेखा आहे. ते म्हणतात की, ''आज त्यांना सगळेच आत्माराम भिडे या नावाने ओळखतात.'' त्यांचे असे म्हणणे आहे की सोशल मीडियामुळे आजही लोकं त्यांना आत्माराम भिडे म्हणून ओळखतात. त्यांचे लाँड्री बिल आजही आत्माराम भिडे याच नावावर येते.