Baipan Bhari Deva Film: सर्वांना उत्सुकता लागलेला 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट 30 जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाचा (Baipan Bhari Deva) ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. अनेक ठिकाणी चित्रपट हाऊसफुल असल्याने शो मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. लहान मुलगी असो वा वयोवृद्ध आजीबाई... महिलांना हा सिनेमा (Marathi Movie) डोक्यावर घेतल्याचं दिसून येतंय. अशातच आता दिग्दर्शिक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक किस्सा सांगितला. 


काय म्हणाले केदार शिंदे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे, असं शिंदे सांगतात. सगळ्या गोष्टी असूनही निर्माता मिळत नव्हता, याचं मला प्रचंड वाईट वाटलं. बऱ्याचदा निर्माता मिळत नाही याचा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आलं. बऱ्याच वर्षांनी मी या चित्रपटाची योजना आखली होती आणि याला निर्माता मिळत नसल्याने मला दु:ख झालं, असं केदार शिंदे यांनी सांगितलं.  मी ज्या लोकांसमोर या चित्रपटाची गोष्ट वाचून दाखवली त्यांना एकंदर सिनेमाची गोष्ट आवडायची, असंही त्यांनी म्हटलंय. लोकं मला म्हणायचे, जत्रासारखी काहीतरी आगळीवेगळी कथा हवी. मात्र, बाईपण भारी देवामध्ये (Baipan Bhari Deva Marathi Movie) असं काही नाहीये.


माझ्या कास्टिंगमध्ये अजिबात बदल झाला नाही. मी सर्व 6 अभिनेत्रींना शुटिंगच्या 4 महिने आधीच स्क्रिप्ट पाठवून ठेवली होती, असं केदार शिंदे म्हणाले आहेत. मी हा सिनेमा पुरुषांसाठी बनवला आहे. या सिनेमाला मिळत असलेलं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. हा सिनेमा आता आमचा नसून मायबाप प्रेक्षकांचा झाल्याचं मत केदार शिंदे यांनी मांडलं होतं. फक्त पाच कोटींच्या बजेट सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 26.19 कोटींची कमाई केली आहे.


पाहा ट्रेलर



दरम्यान, चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. थोडा श्वास घ्या आणि स्वत: साठी जगा, असं दृष्टीकोन अभिव्यक्त करणारा सिनेमा प्रत्येक महिलेला भारावून टाकणारा आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशी या सिनेमाने तीन कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती देखील समोर आली आहे.