मुंबई : अनेक सिनेकलाकार आता वेबसिरिजकडे वळत आहे. सिनेमाप्रमाणेच वेब सिरीज हे अतिशय प्रभावी माध्यम ठरत आहे. असं असताना आता मराठीतील अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज असलेली अभिनेत्री या क्षेत्राकडे वळताना दिसते. सई ताम्हणकर या मराठमोळ्या बोल्ड अभिनेत्रीने या क्षेत्रा पाऊल ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘डेट विथ सई’ही नवी वेब सिरीज सई Zee5 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकताच या वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अतिशय थरारक असा हा टीझर असून प्रेक्षक या वेब सिरीजची वाट पाहत आहेत. 



सईचे जगभरात असंख्य चाहते आहेत. तिच्या या फॅनवर आधारित ही वेब सिरीज आहे. या वेब सिरीजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करतो. सईच्या नकळत तो तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. यातून सईच्या आयुष्यात काय प्रश्न निर्माण होतात हे मांडल आहे. 


या वेब सिरीजमध्ये सई स्वतःच्याच म्हणजे सई ताम्हणकरच्या भूमिकेत दिसणार आहे. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.