मुंबई : 'शिवराज अष्टक' या संकल्पनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्णपाने उलगडण्याचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी सुरु केलेला शिवपराक्रमाचा यज्ञ पाचव्या चित्रपुष्पाच्या दिशेने वेगाने निघाला आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या चित्रपटांनी महाराष्ट्रासह देश-विदेशांतील रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर आता 'सुभेदार' हा पाचवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी 'सुभेदार'चे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, शीर्षक भूमिकेतील अजय पूरकर, त्यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी स्मिता शेवाळे, शेलार मामांच्या दमदार भूमिकेतील समीर धर्माधिकारी, चित्रपटाचे निर्माते आदी मंडळींनी सातारा जिल्ह्यातील गोडवली या तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी भेट दिली होती. तिथे मालुसरे कुटुंबियांच्या उपस्थितीत 'सुभेदार' चित्रपटाच्या प्रतिमेचे पूजन करून या चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. 


आता या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवराज अष्टकातील प्रत्येक सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता शिवराज अष्टकातील पाचव चित्रपुष्पाच्या टीझरने अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. 


दिग्दर्शक  दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा टिझर शेअर करत कॅप्शनन मध्ये लिहीलं आहे की, ''रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा आले मराठे आले मराठे आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे) मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाच्छाई झोडती असे मराठे सुभेदार गड आला पण...''


'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर सुभेदार या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचं दिसत आहेत. 


'सुभेदार' या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मागील काही वर्षांपासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू आहे. वर्तमानकाळात रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या क्षणांचे साक्षीदार बनवण्याच्या या वाटेवर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता दिग्पाल लांजेकरचे मोलाचे योगदान आहे.