मुंबई :  अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर, जिला विंक गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. एकेकाळी इंटरनेट व्हायरल झालेली प्रिया 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओरु अदार लव' या तमिळ चित्रपटात प्रियाने केलेला विंक अॅक्ट खूप प्रसिद्ध झाला. प्रियाच्या त्या विंक अ‍ॅक्टवर बरेच मेम्स आणि फनी व्हिडीओज बनवण्यात आले होते. जे आजही लोकप्रिय आहेत. दरम्यान, बातमी अशी आहे की, प्रिया प्रकाश वरियरचा 'इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी' हा तेलुगु चित्रपट 30 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात ती तेजा सज्जा प्रियासोबत दिसली आहे. फिल्मच्या रिलीजबरोबरच अभिनेता तेजा सज्जाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तेजाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, प्रिया प्रकाश वरियरसोबत त्याची पहिली भेट कशी झाली. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार त्याला आणि प्रियाला पहिल्याच सीनमध्ये किस करायला सांगितलं गेलं होतं. तेजा म्हणाला, 'शूटिंगच्या पहिल्या दिवशी आम्ही कॉम्बिनेशन पार्टसाठी शूटिंग करत होतो, त्यांनी माझी ओळख प्रियाशी करुन दिली, आम्ही हाय हॅलो केलं त्यानंतर फिल्ममेकरने आम्हाला किस करायला सांगितलं'.


या विषयावर प्रिया असंही म्हणाली की, 'किस सीनआधी आमचं एक ब्रीफ इंट्रो सेशन होतं. तेजा आधीच चित्रपटाचं शूटिंग करत होता तर मी नंतर चित्रपटात सामील झाली होते. शूटिंगच्या पहिल्या दिवशी आमच्यात हाय-बाय इतकीच चर्चा झाली. मात्र, दुसर्‍या दिवशी शूटवर येताना मला कळालं की, आमच्यात सगळे इंटेंस रोमांटिक सीन शूट केले जाणार आहेत. 'इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी'चं दिग्दर्शन चित्रपट निर्माते एस.एस. राजू यांनी केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, चित्रपटात प्रिया प्रकाश आणि तेजा यांची केमिस्ट्री खूप धमाल आहे