मुंबई | अभिनेत्री तेजश्री प्रधान, तिच्या दमदार अभिनयासह सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील ती सतत चर्चेत असते. अग्गंबाई सासूबाई या मालिकेने निरोप घेतल्यानंतर घराघरात पोहोचलेली ही शुभ्रा सध्या करतेय तरी काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण मालिकेचा शेवट झाल्यानंतर काही काळ  तेजश्री सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण छोट्या पडद्यावरची ही आदर्श सूनबाई आपल्या फॅन्सपासून जास्त काळ दुर राहु शकली नाही.. तिने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संवाद साधायला सुरुवात केली.


नुकताच तेजश्रीने बालपणीच्या आठवणींना उजाळा देणार एक फोटो शेअर केलाये. ज्यात तेजश्रीने आपली चित्र काढण्याची आवड जपताना दिसतेय..


पण या फोटोत दिसत असल्याप्रमाणे तेजश्री लहान मुलांची  ड्रॉईंग बुक घेत चित्र रंगवायला सुरुवात केलीये. तिच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी ही कमेंट करायला सुरुवात केलीये.या फोटोला तेजश्रीने " Let's get back to our बचपन " असं कॅप्शन देत बालपणीच्या गोष्टी करतानाचा आनंद व्यक्त केलाये.


सध्या तेजश्री स्मॉल स्क्रिनपासून जरी लांब असली तरी तिचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असतात...