मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघंही अनेकदा त्यांच्या लव्हस्टोरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. आणि हेडलाइन्समध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि या मागचं कारण आहे तेजस्वी प्रकाशला शूटिंगदरम्यान छोटा अपघात झाला असून, अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवरुन दिली माहिती
'नागिन 6'च्या सेटवर शूटिंग करत असताना तेजस्वी प्रकाशच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ज्याची माहिती अभिनेत्रीने इंस्टाग्रामद्वारे दिली आहे. तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करण स्माईल देतो आणि म्हणतो, "नुसती कार्टून आहे ही, डोकं फोडून आलीये ही मुलगी." तेजस्वी हसते आणि म्हणते, ''हो, मी शूटिंग करताना डोकं फोडून आलेय''. पुढे करण म्हणाला की तू अगदी 'टॉम अँड की जेरी'च्या टॉमसारखा आहेस, त्यावर दोघंही हसू लागले.


दुखापतीमुळे तेजस्वीच्या डोक्यावर लाल जखम आणि सूज आल्याचं दिसत आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोघंही खूप क्यूट दिसत आहेत आणि करण ज्या प्रकारे तेजस्वीच्या डोक्यावर बर्फ लावत आहे.  



काही दिवसांपूर्वी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा म्युझिक व्हिडिओ 'बारिश आयी है' रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही खूप रोमँटिक अंदाजात दिसत असून त्यांच्या चाहत्यांना दोघांची ही स्टाईल खूप आवडली आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर आतापर्यंत 54 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.