मुंबई : वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तुम्ही या शोमध्ये अनेकदा अफेअर सुरू असल्याचे पाहिलं असेल,  मात्र यावेळी स्पर्धक तेजस्वी प्रकाशने आपल्या वक्तव्यानं सर्वांना आश्चर्यचकित  केलंय. वास्तविक, तेजस्वी प्रकाश उमर रियाजला ती प्रेग्नंट असल्याचं सांगताना दिसत आहे. मात्र, तेजस्वीने हे  सलमान खानच्या सांगण्यावरून सांगितल आहे. आगामी प्रोमोमध्ये सलमानने बॉलीवूड स्टार गोविंदासोबत तेजस्वी प्रकाशसोबत प्रँक करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं घडलं काय ?
तेजस्वी प्रकाश उमरशी बोलताना म्हणाली की , "मला गॅस झाला आहे." हे ऐकून उमर हसू लागतो. तेजस्वी रागाने म्हणते की हा विनोदाचा विषय नाही. सलमानच्या सांगण्यावरून तेजस्वी म्हणते,  "मी आई बनणार आहे."  हे ऐकून उमर हैराण होतो आणि म्हणतो, "ये तू क्या बोल रही है." तेजस्वी मजेत पुढे म्हणाली, " गॅसमुळे मुलगी प्रेग्नंट होऊ शकते का ?"  हे एकल्यानंतर  उमर रियाझ हसत हसत निघून जातो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तेजस्वीच्या या वक्तव्यानं सोशल मिडियावर खळबळ माजवलीये,  यामुळेच ती ट्रोलही होतेय.  पण तीच्या खट्याळ स्वभावामुळे तीचे लाखो चाहते आहेत.  यापुढे घरात सनी लिओनी आणि कनिका कपूरचीही एंट्री होणार आहे आणि दोघंही घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क देणार आहेत.