मुंबई : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस 15' ची एक मजबूत स्पर्धक आहे. शोमध्ये प्रवेश केल्यापासून ती तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. शोच्या सध्याच्या भागात, तेजस्वी प्रकाशने तिच्या बालपणीच्या काही कटू गोष्टी उघड केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यासमोर त्यांनी आपलं बालपण आणि कुटुंबाविषयी सांगितलं. लग्नानंतर लगेचच तिचे पालक एकमेकांपासून दूर राहिले आणि त्यांनी आपले नाते कसे टिकवून ठेवत यशस्वी केले याबाबत खुलासा केला आहे .


या वळणावर आई-वडिलांचं नातं 


तेजस्वी प्रकाश शमिता आणि प्रतीकला सांगते की, लग्नानंतर माझे वडिल आईपासून दूर गेले, त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. तेजस्वीने हे देखील सांगितले की ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी दर 6 महिन्यांनी दुबईला कशी जायची.


तेजस्वी म्हणाली, 'लग्नानंतर लगेचच माझे बाबा दुबईला गेले होते आणि जवळपास दीड वर्ष ते परतलेच नाहीत. नातेवाईकांनी कसे तिला टॉचर केले, पण माझ्या आई-वडिलांनी नातं तुटू दिलं नाही. ते एकमेकांना पत्र लिहायचे. आयएसडी कॉल्सवरही बोलायचे, त्याकाळात आंतरराष्ट्रीय कॉल खूप महाग होते.


तेजस्वीला दर 6 महिन्यांनी दुबईला जावं लागतं होतं


तेजस्वी पुढे म्हणाली, 'एका वर्षानंतर माझ्या वडिलांनी स्वतःचे घर आणि कार खरेदी केली. त्यानंतर त्यांनी माझ्या आईला त्यांच्याकडे बोलावले. पुढे तेजस्वी म्हणाली की, माझ्या वडिलांनी दुबईचे नागरिकत्व मिळवले आहे. आणि मी देखील तेथील नागरिक बनले. त्यामुळे मला दर सहा महिन्यांनी दुबईला जावे लागत होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रीला पालकांचा अभिमान


तेजस्वी प्रकाशनेही शमिता आणि प्रतीक यांच्याशी झालेल्या संभाषणात लग्न आणि नातेसंबंधांबद्दलचे आपले विचार शेअर केले. ती म्हणाली, 'कोणतेही नाते किंवा लग्न परफेक्ट नसते यावर माझा विश्वास आहे, पण मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे.' यादरम्यान तेजस्वीही भावूक झाल्याचे दिसले.