Tejaswini Pandit: मध्यंतरी बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, काही ठराविक चित्रपट निर्माते, ठराविक लोकांनाच घेऊन चित्रपट करतात इतरांना घेत नाहीत, टेलेंट बघत नाहीत अशी टीका वारंवार झालेली पाहायला मिळाली आहे. आता हीच टीका मराठी चित्रपटसृष्टीवरही पाहायला मिळते आहे. सध्या या टीकेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं स्पष्टचं उत्तर दिलं आहे. अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या निमित्तानं सध्या तेजस्विनी पंडित चर्चेत आहे. तिनं सुरू केलेल्या क्रिएटिव्ह वाईब या प्रॉडक्शन (Tejaswini Pandit) हाऊसमधून  तिनं अथांग या रहस्यमय कथेच्या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. या वेबसिरिजला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिनं मराठी चित्रपसृष्टीत होणाऱ्या कंपूशाहीवर आपलं मंत स्पष्ट केलं आहे. (tejaswini pandit reacts on groupsim in marathi film industry says nagraj manjule also takes akash thosar in his film again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करन जोहरमुळे बॉलिवूडमधील गटबाजीच्या कहाण्या सुरू झाल्या होत्या. करण जोहर फक्त कपूर, भट्ट आणि अन्य मोठ्या स्टार कीड्सनाच लॉन्च करतो असा आरोप त्याच्यावर झाला होता. तसाच काहीसा प्रकार मराठीतही असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठीमध्ये संजय जाधव (Sanjay Jadhav) हे त्याच त्याच कलाकारांना त्यांच्या चित्रपटांमध्ये घेतात असा मतंप्रवाह सुरू झाला होता. तेजस्विनीनं पंडित, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी हे अनेकदा संजय जाधव यांच्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत. परंतु असं असलं तरी संजय जाधव यांनीही नवं टेलेंट हेरंल आहे हेही विसरून चालणार नाही. सध्या याच वादावर तेजस्विनीनं आपलं स्पष्ट मतं सांगितलं आहे. 


मराठी चित्रपटसृष्टीत खरंच कंपूशाही आहे का?


''बॉलिवूडमध्ये ग्रुपिझम (Groupism) म्हणजे गटबाजी आहे याची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल अनेकदा बोललंही गेलं आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीत कंपूशाही किंवा ग्रुपिझम हाही प्रकार सुरू झाल्याच्या चर्चा सुरूही झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मी फक्त ठराविक लोकांबरोबरच काम करते आहे अशी टीका माझ्यावर अनेकदा झाली आहे. तीच टीम आणि तेच ठराविक कलाकार असं समीकरणं बनलं आहे. मराठी चित्रपट कलाकारही त्याच त्याच लोकांसोबत काम करतात अशीही टीका होते. काही दिवसांपुर्वी तर मी फक्त संजय जाधव यांच्याबरोबरच काम करते अशाही चर्चा होत होत्या. पण असं असलं तरी दिग्दर्शकाला काही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करणं सोपं जातं'', असं ती म्हणाली.  


नागराज मंजुळेही... 


मराठी चित्रपटसृष्टीत खरंच गटबाजी दिसून येतेय का, या प्रश्नाचं उत्तर देताना तेजस्विनी जरा स्पष्टच बोलली. " नागराज मंजुळेही (Nagraj Munjule) आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की… असं काही नाही की फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे.'' तेजस्विनीची निर्मिती असलेली अथांग ही वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात संदीप खरे, निवेदिता जोशी-सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.