मुंबई : आपण सहसा दोन प्रकारच्या व्यक्तींना भेटतो. एक प्रकारच्या व्यक्ती अशा असतात, ज्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद अगदी मनमुरादपणे लुटतात. तर, दुसऱ्या व्यक्ती अशा असतात, ज्या आपल्याकडे काय नाही त्याचाच विचार करत रडगाणं गात बसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या एका अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला होता. या Instagram Reel Video मध्ये ही अभिनेत्री आपण मधुमेहाशी दोन हात कसे केले हे अगदी उत्साहात सांगताना दिसत आहे. 


ही अभिनेत्री आहे, ऐश्वर्या सखुजा. विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ऐश्वर्यानं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आणि तिच्याकडे पाहून अनेकजण थक्कच झाले. (Aishwarya Sakhuja)


मधुमेह कदाचित त्रासदायक असू शकतो. पण, मीपण कमी धीट नाही... मी दररोजच्या आयुष्यात या टीप्स फॉलो केल्या, ज्यामुळं माझं जगणं सुकर झालं... असं तिनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 


मधुमेहाशी लढण्यासाठी ऐश्वर्यानं कोणत्या टीप्स दिल्या? (Diabetes cure with easy Tips)
- उपाशीपोटी व्यायाम करा
- क्वचित प्रसंगी उपवास करण्यावर भर द्या
- पालेभाज्यांवर आधारित लो फॅट डाएटला प्राधान्य द्या
- रक्तातील ग्लुकोजवर सतत लक्ष ठेवा
- जेवणानंतर प्रत्येक वेळी मध्यम गतीनं किमान 15 मिनिटं चालणं



ऐश्वर्या आणि आजारपण, एक नकोसं समीकरण 
ऐश्वर्याचं सोशल मीडिया प्रोफाईल, तिचा मादक अंदाज आणि नवनवीन स्टायलिश लूक पाहता तिला जन्मापासूनच इतक्या अडचणींचा सामना करावा लागला असेल याची पुसटशीही कल्पना येत नाही. 


एका मुलाखतीदरम्यान, आपण वडिलांना कायमच त्यांनी बऱ्याच कमतरता असणारं मूल जन्माला घातलं असं म्हणत खिल्ली उडवल्याचं तिनं सांगितलं. जन्मत:च आपल्या हृदयाला छिद्र होतं, टीबीही झाला होता, चेहऱ्याच्या अर्धांगवायूचा झटकाही आला होता असं तिनं या मुलाखतीत सांगितलं होतं. ही तिच वेळ होती, जेव्हा ऐश्वर्यानं आपल्याला टाईप वनचा मधुमेह असल्याचंही सांगितलं होतं. 


आता ती आजारांशी झुंजते. पण, दिवसागणिक तिनं स्वत:च्या शरीराचा आदर करण्यावर आणि शरीरावर प्रेम करण्यावर भर दिल्यामुळं कामाप्रमाणेच या गोष्टीही तिच्यासाठी प्राधान्यस्थानी आल्या आहेत.