मुंबई : 'कृष्णादासी' मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री छवी मित्तल हिला काही दिवसांपूर्वीच कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती समोर आली. छवीला स्तनांचा कर्करोग अर्था ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळताच चाहत्यांच्या काळजातही धस्स झालं. इतक्या मोठ्या आजारानं आपल्यावर आघात केला असला तरीही छवी मात्र त्यातही खचलेली नाही. (television actress chhavi mittal breast cancer radiotherapy side effects)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंबहुना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं आपल्या कॅन्सरवरील उपचाराची प्रत्येक माहिती समोर आणली. कॅन्सरमधून सावरत असतानाच आता छवीवर रेडिओग्राफीचे उपचार सुरु आहेत.


यासाठीच जातानाचा एक फोटो तिनं शेअर केला. या फोटोमध्ये छवी कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. तिनं एका हातानं आपल्या स्तनालाही आधार दिला आहे. कॅप्शनमध्ये छवी लिहिते, रेडिएशनचा डेली डोस घेण्यासाठी जात असताना मी स्वत:ला मुंबईच्या या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर धरून ठेवलं आहे. यावेळी मला रेल्वे स्थानकावरी पाटीची आठवण येतेय, 'यात्रीगण कृपया अपने सामान की रक्षा स्वयं करे'. 




छवीनं हे क‌ॅप्शन देताना त्याला विनोदी अंदाजात सादर करत, पुन्हा एकदा तिच्यातील सकारात्मकतेनं सर्वांची मनं जिंकली. एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून तिनं काही गोष्टीही सर्वांशी शेअर केल्या आहेत. 


रेडिएशन थेरेपीच्या वेळेला नेमक्या कोणत्या गोष्टी घडतात. यानंतर कोणते बदल होतात इथपासून आपण काय काळजी घ्यावी, इथपर्यंत बरीच माहिती तिनं या युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.