Exercise For Normal Delivery: गर्भधारणा झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य लहानमोठे बदल घडत असतात. एक जीव पोटात वाढत असल्यामुळं होणारे हे बदल काही प्रमाणात आव्हानात्मक असतात ही बाबही महत्त्वाची. टेलिव्हीजन जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री देबिना बॅर्जीनंही अशा परिस्थितीचा सामना केला. पहिल्या लेकिच्या जन्मानंतर देबिनानं (Debina Bannerjee Pregnancy) काही महिन्यांतच आपण दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी डिलिव्हरी सी-सेक्शन (C-Section) पद्धतीनं होऊ नये यासाठी देबिना आतापासूनच प्रयत्न करु लागली आहे. त्यामुळं ती आता शारीरिक सुदृढतेवर अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. 


देबिनानं हल्लीच तिच्या You Tube चॅनलवर एक Video शेअर केला आहे. ती यामध्ये काही व्यायाम प्रकार करताना दिसत आहे. देबिनाच्या मते असे काही व्यायामप्रकार आहेत ज्यामुळं नॅच्युरल वजाइनल बर्थ (natural vaginal birth) ची जास्त शक्यता असते. 




सी सेक्शनही वाईट पर्याय नाही, पण नैसर्गिकरित्या बाळाचा जन्म झाल्यास महिलेच्या आरोग्यात वेगानं सुधारणा होतात, असंही ती म्हणाली. गरोदरपणा महिलांच्या आरोग्यास होणारे फायदे हेरत देबिनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं शरीर बळकट राहण्यासोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते आणि सी - सेक्शन किंवा सिजेरियन डिलीव्हरीची शक्यताही कमी होते.