मुंबई : कोविड काळामध्ये प्रवास करताना अधिक सुरक्षितता बाळगली जाऊ लागली. सुरक्षित अंतर पाळण्यापासून ते अगदी आपण जात असणाऱ्या वाहनामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे की नाही इथपर्यंत बऱ्याच गोष्टींची काळजी घेण्यात येते. रेल्वे प्रवासापासून ते विमान प्रवासापर्यंत सर्वत्र हीच परिस्थिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच मागील काही काळापासून विमान प्रवास करणाऱ्यांचा आकडा तुलनेने जास्त. पण, एक अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरत आहे. ही अभिनेत्री आणि तिच्या पतीनं मुंबई ते दिल्ली अशा प्रवासासाठी रेल्वे मार्गाचा पर्याय निवडला आणि त्यांचा हा साधेपणा चाहत्यांची मनं जिंकून गेला. 


ही सेलिब्रिटी जोडी आहे, अभिनेत्री दीपिका कक्कड आणि तिचा पती शोहेब इब्राहिम यांची. दीपिका आणि शोहेबनं त्यांच्या या प्रवासाचा एक व्लॉगही तयार केला. या प्रवासाला निघताना त्यांनी चिकन कोरमा आणि बाजरीची चपाती घरातूनच बनवून नेली होती. प्रवासादरम्यान ही जोडी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही करताना दिसली. 



सेलिब्रिटी असूनही रेल्वेनं प्रवास करणाऱ्या शोहेब आणि दीपिका यांनी पुन्हा एकदा या अनोख्या मार्गानं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. एका मालिकेच्या निमित्तानं एकत्र झळकलेल्या या जोडीनं पुढे विवाहबंधनात अडकत सहजीवनाची सुरुवात केली.