मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. टेलिव्हिजनवरील मालिकेत भूमिका साकारणारी काम्या, दिल्लीतील शलभ डांगसह लग्नबंधनात अडकणार आहे. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. त्याच दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काम्या आणि शलभ पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची माहिती आहे. याआधी काम्याचा विवाह बंटी नेगी या व्यावसायिकाशी झाला होता. परंतु २०१३ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.




'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या एक्सक्लूसिव मुलाखती दरम्यान काम्याने सांगितलं की, पुढील वर्षी मी यादरम्यान विवाहबद्ध असेल. मी फेब्रुवारीमध्ये शलभला भेटली होती. आम्ही भेटल्यापासून जवळपास एका महिन्यात शलभने मला प्रपोज केलं असल्याचं तिने सांगितलं. 


या मुलाखतीदरम्यान काम्याने, पुन्हा एकदा लग्न करणाचा निर्णय घेणं माझ्यासाठी सोप्पं नसल्याचं म्हटलं.



'पुन्हा एकदा लग्न करणं माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती. त्यामुळे याबाबत मी पूर्णपणे विचार केला. एकदा लग्न तुटल्यानंतर पुन्हा प्रेम करण्याची कल्पना कठीण होती. एक वेळ अशी आली की मी, लग्नाच्याविरोधातच होती. पण शलभने पुन्हा एकदा लग्न आणि प्रेमावरील माझा विश्वास जागृत केला. मी एका १६ वर्षांच्या मुलीसारखी झाली आहे जी, पूर्णपणे प्रेमात आहे' अशा भावना काम्याने व्यक्त केल्या आहेत.


काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा १० वर्षांचा मुलगा आहे.