मुंबई : बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी टी.व्ही. अभिनेत्री कृतिका कामरा पर्दापणापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला तिचा फोटो.


काय आहे या फोटोत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यात कृतिका आणि जॅकी हॅंगआऊट करताना दिसत आहेत. गेल्यावर्षी आपला वाढदिवसही तिने जॅकीसोबत सेलिब्रेट केला होता. आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तेलगू सिनेमा पिल्ली चोपुल्लू च्या हिंदी रिमेकमध्ये कृतिका आणि जॅकीची जोडी पाहायला मिळणार आहे.



कामावितिरक्तही दोघे एकत्र


कामावितिरक्तही हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवतात, असे समजतंय. अलिकडेच दोघांना नाईट क्लबमध्ये एकत्र पाहिले होते. 


 पर्दापणापूर्वीच चर्चा


पिल्ली चोपुल्लू च्या हिंदी रिमेकमध्ये जॅकी एका गुजराती मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. टी.व्ही. मालिकांमधून लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्रीचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. तर जॅकी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या दिल जंगली है या सिनेमात झळकला होता.