मुंबई : अनेकदा कलाकार बहुविध कारणांनी चर्चेत असतात. अभिनेत्रींच्या प्रसिद्धीचे निकष नजरेत घ्यायचं झाल्यास त्यामध्ये मादकता, स्टाईल स्टेटमेंट हे सारं आलंच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मादकतेच्या बाबतीत एक अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? ओळखता येतंय का? 


ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड अंदाजामुळं चर्चेत असणारी ही अभिनेत्री आहे निया शर्मा. 


नियानं सोशल मीडियावर एक पोस्टच करायची खोटी की त्यावर अनेक लाईक्स आणि कमेंट्स यायला सुरुवात होते. तिची प्रत्येक अदा पाहणाऱ्याला घायाळ करुन जाते. आताही तिनं असाच एक फोटो पोस्ट केला आणि एकच खळबळ माजवली. 


निया या फोटोमध्ये ब्रालेटमध्ये दिसत आहे. या पोषाखात तिनं दिलेली पोझ पाहून आरारा.... खतरनाक... असंही काहीजण म्हणत आहेत. 




कॅप्शनही हटके... 
नियानं तिचे हे फोटो अगदी हटके कॅप्शनसह शेअर केले. मला बिस्कीटाऐवजी ब्राऊनी आवडतात असं म्हणत तिनं हे फोटो सर्वांच्या भेटीला आणले. कोणी तिच्या या फोटोवर ते आवडल्याची प्रतिक्रिया दिली, तर कोणी मात्र नाकंही मुरडली. 


अतिशय बोल्ड फोटो शेअर करण्याची नियाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिनं शेअर केलेले बरेच फोटो नेटकऱ्यांनी वारंवार तिच्या प्रोफाईलवर जाऊन पाहिले आहेत. मादकता आणि सौंदर्याचा हा मेळ तुम्ही पाहिला का?