Nia Sharma: टीव्हीच्या सर्वात अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर निया शर्माचे (Nia Sharma) नाव टॉप 5 च्या यादीत नक्कीच येईल. निया तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते आणि आता पुन्हा एकदा निया अशा लूकमध्ये दिसली की प्रेक्षक थक्क झाले आहेत. (television actress nia sharma wear tribal clothes netizens badly trolls her video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विखुरलेले विस्कटलेले केस, फाटलेले जुने कपडे आणि आदिवासी लुकमध्ये नियाने घेतलेला ड्रेस सगळीकडे सध्या धुमाकुळ घालतो आहे. 


निया शर्मा झलक दिखला जा (Jhalak Dikh la Ja) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसते आहे. या आठवड्यात तिने आदिवासी नृत्याची थीम निवडली आहे आणि नियाने तसा लूक केला आहे. हा तिचा लुक चाहत्यांच्या लक्षात आल्यावर मात्र तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. आणि तिला राखी आणि उर्फीची उपमा देत तिची खिल्ली उडवली आहे. 


निया शर्मा बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर दिसली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मालिकेत दिसत नव्हती. 'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा' अशा काही लोकप्रिय मालिकांतून ती प्रेक्षकांसमोर आली होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


झलक दिखला जा शो 5 वर्षांनंतर टीव्हीवर परतला आहे. हा त्याचा 10वा सीझन आहे. माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि करण जोहर या शोचं जजिंग करत आहेत तर मनीष पॉल या शोचे होस्ट आहेत. निया शर्मा व्यतिरिक्त यावेळी फैजल शेख, रुबिना दिलीक, शिल्पा शिंदे, धीरज धूपर, पारस कालनावट, अमृता खानविलकर, अली असगर हे स्पर्धक या शोमध्ये डान्स करताना दिसणार आहेत.