मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री रुही सिंग हिच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांकडून रुहीचे दोन मित्र राहुल सिंग, स्वप्नील सिंग यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्र उलटल्यावनंतर दोन वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या. जेव्हा रुही आणि तिचे मित्र चारचाकी वाहानतून घरी परतत होते. खार लिंकिंक रोड परिसरात असताना एखा खाद्यपदार्थांच्या दुकानाच्या प्रसाधनगृहाचा वापर करण्यासाठी म्हणन ते गेले. पण, त्यावेळी ते दुकान बंद झाल्यामुळे तेथे काम करण्याऱ्यांनी रूही आणि तिच्या मित्रांना तेथून जाण्यास सांहितलं. पण, त्या तिघांनीही वारंवार त्या दुकानाचं दार वाजवणं सुरूच ठेवलं. अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी पोलीसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली आणि तक्रार केली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मद्याच्या धुंदीत असणाऱ्या या तिघांनीही पोलिसांशी गैरवर्तणूक करत त्यांच्या शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. रूहीच्या दोन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण, रात्रीची वेळ असल्यामुळे तिच्यावर अटकेची कारवाई करता आली नाही. 



 


पोलिसांशी झालेल्या या वादानंतर जवळपास तासाभरातच आणखी एका घटनेमुळे रूही अडचणीत आली. घरी परतत असतेवेळी भरधाव वेगात असणाऱ्या तिच्या कारने पाच वाहनांना धडक दिली. ज्यानंतर तिच्या रक्ताने नमुने आणि काही वैद्यकिय चाचण्यांत ती नशेच्या अवस्थेत असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती (दक्षिण विभाग) अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोज कुमार शर्मा यांनी दिली.

खार पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या त्रिकुटावर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या ३२३, ३३२, ५०४, ५१० आणि ३४ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सांताक्रूझ पोलिसांनी रुहीवर भारतीय दंडसंविधानाच्या कलम २७९ अंतर्गत सावधगिरी न बाळगता अतिवेगात वाहन चालवत जीव धोक्यात घालण्याच्या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे.