मुंबई : सोमवारी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाअंतर्गत देशावरील सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारकडून अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला. ज्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आणि देशात एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा झाली. असंख्य देशवासिय आणि बहुविध क्षेत्रांतील दिग्गजांनी या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. कलाविश्वातूनही या बाबतीत अतिशय उत्फूर्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यातच एका अभिनेत्याची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दिलेली ही प्रतिक्रिया अधिक चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता या अभिनेत्याचं एक स्वप्न साकार होणार आहे. ज्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, तो अभिनेता आहे गुरमीत चौधरी. 


गुरमीतने ट्विट करत या निर्णयाचं स्वागत केलं. 'बालपणीचा अधिकाधिक काळ मी काश्मीरमधी आर्मी कॅम्पमध्ये व्यतीत केला होता. याच भूमीशी आपण जोडलो गेलो आहोत, असंच मला कायम वाटत राहायचं', असं लिहित या निर्णयानंतर आता काश्मीरमध्ये घर खरेदी करुन याच ठिकाणी एखादा व्यवसाय सुरु करण्याचं माझं स्वप्न साकार होणार आहे. हे स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे या शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला. 



गुरमीतचं हे ट्विट आणि त्याचा एकंदर आशावाद पाहता, येत्या काळात काश्मीरमध्ये नवी सुरुवात तो नेमका कधी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जम्मू- काश्मीरच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या मह्त्वाच्यानिर्णयाविषयी फक्त गपरमीतच नव्हे तर, कैलाश खेर, अनुपम खेर, परेश रावल आणि इतरही कलाकारांनी त्यांच्या उस्त्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.