मुंबई : कलाविश्व, मग ते मालिका विश्व असो किंवा चित्रपट जगत. अनेक कलाकार, त्यांचे स्वभाव, तितक्याच रोजच्या घडामोडी असं एकंदर गोंधळाचं वातावरण नेहमीच या संपूर्ण कलाविश्वात पाहायला मिळतं. या गोंधळाला जोड असते ती म्हणजे असंख्य चर्चांची. सध्या अशीच एक चर्चा रंगत आहे. ती म्हणजे अभिनेत्री रेहाना पंडित आणि निया शर्मा यांच्या एका किसची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रेहाना आणि नियाने माध्यमांशी संवाद साधतेवेळी एकमेकींना किस केलं, ज्यानंतर त्यांच्या किसचा किस्सा अनेकांच्याच भुवया उंचावल्या. आपण केलेल्या एका किसमुळे होणाऱ्या चर्चा पाहता निया आणि रेहाना यांनी याची इतकी हवा करण्याची गरज का, असं म्हणत या चर्चांवर आणि अनेकांच्याच मानसिकतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. मुख्य म्हणजे याआधीही 'जमाई राजा' या मालिकेच्या सेटवर या दोघींनी किस केलं असून, रेहानाने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळीही बऱ्याच चर्चांनी डोकं वर काढलं होतं. त्याविषयी प्रतिक्रिया देत याची इतकी चर्चा का होतेय?, असा प्रश्न उपस्थित करत मुली गालांवर एकमेकींचा मुका घेऊ शकतात मक ओठांवर का नाही, असा सवाल तिने केला होता. निया ही माझी फार चांगली मैत्रीण असून, आम्हा दोघांनाही एकमेकींचा स्वभाव, फॅशन सेन्स या गोष्टी आवडतात, असं तिने स्पष्ट केलं. 



होळीच्या निमित्ताने याच किसची पुनरावृत्ती करणाऱ्या रेहाने 'बॉम्बे टाईम्स'शी संवाद साधताना आपण किस केलं म्हणजे लेस्बियन आहोत असं नाही ही बाब स्पष्ट केली. 'माझ्या बहिणीनंतर मी कोणाला किस करत असेन तर ती निया आहे. ती मला बहिणीसारखीच आहे. त्या दिवशी मला येण्यास उशिर झाला म्हणून नियाने चिंता व्यक्त केली. तिच्या या वागण्याप्रती मी प्रेम व्यक्त करण्याच्या निखळ भावनेने तिला किस केल. म्हणून काय आम्ही कोणतं लेसबियन कृत्य केलं असं नाही', असं ती ठामपणे म्हणाली. 



निया शर्मानेही या एका लहान गोष्टीला उगाचच वाव देण्यात येत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. या किसकडे इतरांचा पाहण्याचा काय दृष्टीकोन आहे हे आम्ही बदलू शकत नाही, उडवल्या जाणाऱ्या खिल्लीवरही आमचा ताबा नाही. रेहाना ही माझ्या बहिणीसारखी आहे. पाच वर्षांच्या ओळखीनंतर इतकं दृढ नातं तर असतंच. तिच्याशीही माझं तसंच नातं आहे. आता त्यावर इतर सर्वजण काय विचार करतात याचा मला फारसा फरक पडत नाही', असं नियाने म्हणत सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा किसचा किस्सा आपल्या पचनी पडत नसल्याची बाब अधोरेखित केली.