नवी दिल्ली : 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'मास्टरशेफ इंडिया' या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱ्या आणि 'पोस्ट प्रोड्युसर'पदी कार्यरत असणाऱ्या सोहन चौहानचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईच्या आरे कॉलनी येथील रॉयल पाल्म्स सोसायटीच्या तलावात त्य़ाचा मृतदेह आढळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशयास्पद अवस्थेत सोहनचा मृतहेद आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणीचा तपास सुरू केला. प्राथमिक पातळीवर हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. सोहनचा मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. 


'बॉलिवूड लाईफ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री सोहनचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला. त्याच्याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोहन मुंबईतील त्याच्या घरी एकटाच होता. त्याची पत्नी दिल्लीला होती. हाती आलेल्या माहितीनुसार सोहला त्याच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने शेवटचं पाहिलं होतं. दरम्यान, तो १३ जूनपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होता. ९ जून रोजी त्याने 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स'च्या अंतिम सोहळ्याविषयी एक पोस्ट लिहिली होती.