TMKOC : `तारक मेहता`मधून आता चंपक चाचांनी घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधून आणखी एका कलाकाराने घेतला ब्रेक, या कारणाने आता चंपकचाचा मालिकेत दिसणार नाहीत
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध हिंदी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC). गेली चौदा वर्ष ही मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलंय. पण गेल्या काही महिन्यात या मालिकेतील अनेक कलाकार या मालिकेतून बाहेर पडलेत. आता यात आणखी एक नाव यात जोडलं गेलं आहे. 'तारक मेहता'मधील प्रमुख पात्र जेठलाल गडाचे (Jethalal Gada) वडिल अर्थात चंपक चाचा (Champak Chacha) यांनी या मालिकेतून ब्रेक घेतल्याची माहिती आहे. चंपक चाचांचं पात्र अमित भट्ट (Amit Bhatt) हा अभिनेता साकारतोय. चंपक चाचाने या मालिकेतून ब्रेक घेतल्याच्या वृताने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चंपक चाचांनी का घेतला ब्रेक
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत चंपक चाचांची भूमिका साकारणारे अमित भट्ट काही दिवसांपूर्वी मालिकेच्या शुटिंग दरम्यान गंभीर जखमी झाले होते. या दुखापतीतून ते अजूनही सावलेले नाहीत. त्यामुळे अमित भट्ट यांना डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमित भट्ट यांना या मालिकेतून काही दिवस दूर रहावं लागणार आहे. या कारणाने पुढच्या काही एपिसोडमध्ये चंपक चाचा मालिकेत (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest Episode) दिसणार नाहीत.
हे ही वाचा : मुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे परत येतोय, मनोज वाजपेयीची पोस्ट व्हायरल
मालिकेच्या आयोजकांशी भांडण झाल्याच्या अफवा
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार बाहेर पडलेत. यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणी, लेखक तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा, रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह, अंजली मेहता या प्रमुख कलाकारांनी मालिकेला अलिवदा केलाय. आयोजकांशी खटका उडाल्याने हे कलाकार बाहेर पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे चंपक चाचा अर्थात अमित भट्ट यांनी मालिकेत ब्रेक घेतल्यानंतर त्यांचंही आयोजकांशी भांडण झाल्याची अफवा पसरली होती. पण दुखापतीमुळे अमित भट्ट यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचं खरं कारण समोर आलं आहे.