मनोरंजन विश्वात शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या
फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. राहत्या घरी त्याने आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.
Sudheer Varma Passes Away : प्रसिद्ध अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (Actor Sudheer Varma Passes Away) दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. राहत्या घरी त्याने आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सुधीर वर्माचा सहकलाकार सुधाकरने त्याच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात त्याने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. (Telugu Actor Sudheer Varma Passes Away Telugu Cinema latest marathi news)
सुधीर वर्माच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटिंनी शोक व्यक्त केला आहे. 2013 साली सुधीर वर्माने 'स्वामी रा रा' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र खरी ओळख त्याला 2016 मध्ये कुंदनपू बोम्मा या चित्रपटामधून मिळाली होती. सुधीरच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलंं नसून त्याने इतकं टोकाचं पाऊल कोणत्या कारणामुळे उचललं यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
दरम्यान, 2022 मध्ये तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील बड्या लोकांचं निधन झालं आहे. यामध्ये गेल्या वर्षी अभिनेता महेश बाबूचे वडील, सुपरस्टार घटामनेनी आणि त्यांचा मुलगा रमेश बाबू यांचंही निधन झालं होतं.