Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आले आहेत. त्यांचा चित्रपट पाहता यावा म्हणून अनेक कंपनींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. तर काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फक्त सुट्टी नाही तर चित्रपटाची तिकिट देखील भेट केली. रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 50 कोटींचा आकडा पार केला होता. आता चित्रपटानं दुसऱ्या दिवशी किती कमाई केली असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकनं दिलेल्या माहितीनुसार, जेलर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 27 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटानं 48.35 कोटींचा आकडा पार केला होता. चित्रपटानं दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर 75.35 कोटींचा आकडा पार केला आहे. दोन दिवसात चित्रपटानं केलेली ही कमाई सगळ्यात जास्त आहे. तर जगभरातील पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्यानं 72 कोटींची कमाई केली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रजनीकांत यांच्या भूमिकेविषयी बोलायचं झालं तर ते जी भूमिका साकारत आहे तिचं नाव टायगर मुथुवेल पांडियन असे आहे. या चित्रपटात रजनीकांत यांचे दोन वेगळी रुपं पाहायला मिळणार आहेत. एका वाईट वृत्तीच्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी एक सर्वसाधारण व्यक्ती कशा प्रकारे तलवार हातात घेते हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. वयाच्या 72 व्या वर्षी रजनीकांत यांना स्टंट करताना पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे. 


हेही वाचा : गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल


रजनीकांत यांचा हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यात आता पुढच्या तीन दिवसांच्या सुट्ट्या पाहता प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतीलच अशी आशा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. जेलर विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत शिव राजकुमार, मिरना मेनन, तमन्ना भाटिया,  राम्या कृष्णन, योगी बाबू, प्रियांका मोहन, विनायकन आणि वसंत रवि हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर चित्रपटातील गाणं खूप लोकप्रिय ठरलं आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड केला आहे. तर चित्रपटात मल्याळम अभिनेता मोहनलाल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.